भारत ठरतोय जगासाठी वरदान.५५ देशांना करणार हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा.

संपूर्ण जगत सध्या कोरोनाने अक्षरशा थैमान घातले आहे. संपूर्ण जग कोरोनाविरुद्ध युद्ध लढत आहे. काही देशांना सोडले तर बाकीच्या सर्व देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक देश आपआपल्या परीने कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यासाठी धडपड करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही डोज न निघल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता असणार्‍या देशाला कोरोनाने नाकीनऊ आणले आहे.

याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत मात्र जवळपास ५५ देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करणार आहे. भारत या संकटाच्या काळात सर्वांना मदत करण्यास पुढाकार घेत आहे. कोरोनाचे भारतावर देखील संकट असतांना भारत सर्वांना मदत करून माणुसकीच्या धर्माचे पालन करत आहे. भारताने अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा केला असून बाकीच्या देशांना सुद्धा पुरवठा करत आहे. त्यामुळे भारत सध्या जगातील देशांसामोर वरदान ठरत आहे. तसेच बाकीच्या देश सुद्धा भारताने केलेल्या मदतीसाठी भारताचे आभार मानत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा….! जून ते सप्टेबर महिन्यात मान्सुन बरसणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *