भारतीय महिला संघाचा ‘हॅट्रिक’ सह उपांत्य फेरीत प्रवेश.

आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत मजल मारली आहे. आज झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आज भारतीय महिलांनी न्यूझीलंड वर ३ धावांनी विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाची विजयी घौडदौड सुरवातीपासूनच चालू आहे. याआधी भारतील संघाने आस्ट्रेलिया व बांगलादेश संघाचा पराभव केला आहे. सेमी फायनल फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे.

न्यूझीलंड विरुद्धचा सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहचला. शेवटच्या षटकात न्यूझीलंड संघाला ६ चेंडूत १६ धावांची आवश्यकता होती. परंतु भारतीय गोलंदाज शिखा पांडे ने केवळ १२ धावा देऊन भारतीय संघाला ३ धावांनी विजय मिळवून दिला. भारताकडून सर्वाधिक  शफालीने ४६ धावा केल्या. तर शिखा,दीप्ती, राजेश्वरी, पूनम आणि राधा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. न्यूझीलंड कडून अमेलीया केर्र हिने सर्वाधिक ३४ धावा व २ विकेट्स घेतल्या. 

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *