भारतातील कोरोंनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ, सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर

भारतातील कोरोंनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार भारताने रशिला मागे टाकत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप भारतीयांची चिंता वाढवणारी आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत, मात्र तितकसं यश अद्याप मिळालेलं दिसत नाही.

वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ९५ हजार ३९६ आहे. तर रशियामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८१ हजार २५१  एवढी आहे. मात्र भारताच्या तुलनेने रशियातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची वाढलेली संख्या कमी आहे. आज रशियात ६ हजार ७३६  रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या भारताच्या पुढे अमेरिका आणि ब्राझील हे दोन आहेत. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या २९ लाखांच्या पुढे आहे, तर ब्राझीलमध्ये ही संख्या १५ लाखांहून अधिक आहे.यामध्ये भारताची चिंता वाढविणारी बाब म्हणजे गेल्या तासांत भारतात २१ हजार ४९२ नवीन रुग्ण मिळाले आहे.

महाराष्ट्रात काल ६५५५ नवीन रुग्णांची नोंद 

राज्यात देखील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असून काल एका दिवशी राज्यात तब्बल ६५५५ नविन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २ लाख ६ हजार ६१९ इतकी झाली आहे. काल नवीन ३ हजार ६५८  कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १ लाख ११  हजार ७४० रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण ८६ हजार ४० अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज १५१ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे काल एकूण ३ हजार ६५८  कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५४.०८ टक्के एवढं आहे.

राज्यातील हॉटेल व्यवसाय चालू होण्याची शक्यता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *