भारताच्या जमिनीवर डोळे ठेवाल तर डोळे काढून ठेवण्याची आमच्यात क्षमता.: नितीन गडकरी

भारत आणि चीन यांच्यात सिमावादावरून तणावाचे वातावण निर्माण झाले आहे. चीन सतत भारताला धोका देऊन कुरघोड्या करत आहे. याच भारत आणि चीन यांच्या वादावर केंद्रीय दळणवळण मंत्री यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना चीन सोबतच पाकिस्तानला देखील मोठा इशारा दिला आहे. आम्ही कुणावरही आक्रमण करू इच्छित नाही. पण आमच्या सीमा रेषांवर कुणी नजर ठेऊन असेल तर आम्हाला  त्याच भाषेत उत्तर देणे ठाऊक आहे. असे म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चीनला इषारा दिला आहे.

नितीन गडकरी यांनी नागपुरातून भाजपाच्या वर्चुअल रॅलीला संबोधित करताना ” आम्ही विस्तारवादी नसून कुठल्याही देशातील दहशदवादाचे समर्थन करत नाही. शांती आणि अहिंसा या तत्वावर काम करतो. शक्तीशाली असल्यानंतरच आपल्या देशातील नागरिकांमध्ये शांती आणि सुरक्षा स्थापन केली जाऊ शकते. त्यामुळे आम्हीं भारताला शक्तिशाली करत अहो. आमचा देश मोठा असला तरी आम्ही भूतान नेपाळ सारख्या लहान देशांकडे कधी वर नजरेने पहिले नाही. आम्हाला कोणाचीही जमीन नको आहे. पण आमच्या जमिनीकडे कोणी बघितले तर आम्ही त्यांचे डोळे काढून घ्यायची क्षमता ठेवतो असे वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *