भारताची मोठी कामगिरी सर्वात स्वस्त आणि जलद कोरोना किट केली तयार.

कोरोनाचा देशातील प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना चाचण्यांचा वेग वाढणे अत्यंत गरजेचे होते. त्यात कोरोना चाचणीसाठी पुरेसे किट नसणे आणि दुस़रीकडे खासगी रुग्णालयातून चाचणीसाठी हजारो रुपये उकळत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. त्यातच आता दिलासादायक बाब समोर आली आहे. भारताने सर्वात स्वस्त कोरोना चाचणीची किट तयार केली आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबाद (IIT -हैदराबाद) च्या संशोधकांनी असा कोविड -१९ चाचणीसाठी एक किट विकसित केली आहे, ज्याचा परिणाम अवघ्या २० मिनिटांत होईल, असा त्यांचा दावा आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर किट ५५० रुपये किंमतीने विकसित केले गेले असून मोठ्या संख्येने उत्पादन केल्यास याची किंमत ३५० रुपयांपर्यंत असू शकते.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हे किट सहज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येणार असून याची उपलब्धता आवश्यकतेनुसार करता येणार आहे. स्वस्त कोरोना किट तयार केल्यामुळे सर्वांनाच चाचणी करता येईल. यातूनही कोरोना रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणणे सोपे जाईल. त्यामुळे आता हैदराबादच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज व इस्पितळात चाचणी किटच्या  पेटंटसाठी संशोधकांनी अर्ज केला आहे आणि क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर कडे परवानगी मागण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *