भारताकडून चीनला जोरदार झटका.

लदाखमध्ये झालेल्या भारत आणि चीन सैनिकांदरम्यान हिंसक संघर्षांनंतर देशात चीन वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या आहे. लदाख मध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या २० सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. त्याबरोबर या संघर्षात ४५ चीनी सैनिक मारले गेल्याचे एका अहवालानुसार समोर येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आता भारताने चीनी कंपन्यांना धक्का देणे सुरू केले आहे. भारतीय रेल्वेने चीनला देण्यात आलेले ४७० कोंटीचे कंत्राट रद्द केले आहे. ४ वर्षात केवळ २० टक्के काम केले गेले आहे. संथ गतीने काम चालू असल्याने सदर कंत्राट रद्द केले असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागानेही बीएसएनएलच्या ४ जी अपग्रेट करण्यासाठी चीनी वस्तूंचा वापर केला जाणार नाही असा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने बीएसएनएलला सुरक्षेतेच्या कारणास्तव चीनी वस्तूंचा वापर करू नका असे सांगितले आहे. त्यामुळे आता भारताकडून चीनला झटका देण्याचे काम चालू झाले आहे.

भारताला डिवचलं तर उत्तर देण्यास सक्षम : पंतप्रधान

गलवान खोऱ्यात हिंसक झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली देताना पंतप्रधान मोदी बुधवारी म्हणाले होते की, “भारताला शांतता हवी आहे. पण आम्हाला डिवचलं तर उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. आम्ही शेजारील देशांप्रती मैत्री आणि सहकार्याची भावना ठेवली आहे. परंतु देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी कठोर पावलं उचलण्यासाठी आम्ही मागे हटणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *