भाजपाकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर. पंकजा मुंडे, खडसेंना धक्का.

राज्यातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे त्याकरिता भाजप सध्याची संख्याबळ पाहता भाजपच्या वाट्याला जागा जागा जिंकता येईल असे दिस दिसून येत आहे परंतु मित्रपक्षाच्या सहाय्याने भाजप चौथी ही जागा होऊ शकते अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळे भाजपाकडून पंकजा मुंडे एकनाथ खडसे व चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असे सांगण्यात येत होते मात्र भाजपा कडून प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे, रणजीतसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे हे काही दिवसांपासून पक्षांवर नाराज असल्याचे दिसून येत होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे हे प्रचंड नाराज झाले असून त्यांनी भाजपा कोणत्या दिशेने चाललंय अशी प्रतिक्रिया दिली आहे. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. ‘मी ४० ते ४२ वर्षे एकनिष्ठ राहून भाजपचं काम करतोय. पक्ष वाढवताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. चढउतार पाहिले. आतातरी मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पक्षाला शिव्या घालणाऱ्यांना मान दिला गेला. भाजप कोणत्या दिशेनं चाललाय, यावर आता चिंतन करण्याची गरज आहे,’ असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *