भद्रावती तालुक्यातील तीस गांवात रंगमुक्त,व्यसनमुक्त होळी ,श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ यांचा अनोखा उपक्रम.

भद्रावती ता. प्रतिनिधि
श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ तर्फे भद्रावती तालुक्यातील गोरजा,कुणाला,घोड़पेठ व गोनाड या सारख्या अनेक गांव मध्ये ग्रामगिता प्रणीत रंगमुक्त,व्यसनमुक्त,पर्यावरणमुक्त होळी कार्यक्रम राबविन्यात आले. या कार्यक्रमात ग्रामगिता व राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे विचार व पर्यावरणपूरक तथा योग व निसर्गोपचार आरोग्य विषय अमूल्य मार्गदर्शन डॉ. पूजा देऊरकर यानी दिले. नामदेव मारोती आस्वले संयोजक रंगमुक्त,व्यसनमुक्त,पर्यावरणयुक्त होळी अभियान प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ,सचिव, सुसंस्कार शिबीर,सागरा यांच्या अतक परिश्रमाने एकूण तिस गांवात यशस्वीरित्या अभियान राबविन्यात आले.
गावांमध्ये रॅली काढून रंगमुक्त, व्यसनमुक्त, पर्यावरणयुक्त होळी चे जनजागृति केले असून डॉ. पूजा देऊरकर यानी आपल्या सहकारी व चमु सोबत प्रत्येक गांवात भेट दिले व मार्गदर्शन केले. रंगमुक्त व व्यसनमुक्त होळी साजरी करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने पर्यावरणाचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन होळी साजरी केली पाहिजे असा संदेश गुरुदेव सेवा मंडळाने यावेळी दिला.

कोरोना भीती नको काळजी हवी!

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *