ब्रेकिंग न्यूज…! सुप्रसिद्ध हिंदी अभिनेता इरफान खान यांचे दुःखद निधन.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे आज दुःखद निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला आहे. इरफान खान यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं असून आपल्या अभिनयाने त्याने सर्वानाच प्रभावित केलं होतं. इरफान खान हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंजत होता शेवटी त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

वयाच्या ५४ व्या वर्षी इरफान खान यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. अनेक हिंदी इंग्लिश चित्रपटात काम केलं होतं. तसेच विविध मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होत. इंग्लिश मिडीयम हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. इरफान खानच्या अप्रतिम अभिनयामुळे त्याला भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे इरफान खानच्या जाण्याने चित्रपट सृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

इरफान खान यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला आहे. इरफान खान हे ताकदीचे अभिनेते होते. जागतिक सिनेमात इरफान खान यांनी मोठं काम केलं आहे. इरफान खान आपल्या सर्वांना लवकर सोडून गेले. इरफान यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे 

अभिताभ बच्चन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *