ब्रेकिंग न्यूज…! महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम.

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन कायम राहणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही उलटसुलट बातम्या येण्याऐवजी मी तुम्हाला ही माहिती देतो आहे. आजपर्यंत जे धैर्य दाखवलंत तसंच यापुढेही दाखवा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत.

लॉकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू, असा धीरही त्यांनी राज्यातील नागरिकांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *