बैलाने वाचविले शेतकऱ्याचे प्राण , मगरीने केला हल्ला बैलाने वाचविले प्राण.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याजवळ सातवे येथील वारणा नदीच्या काठी बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकर्यायवर मगरीने हल्ला चढवला. मात्र बैलाने शेतकर्या ला पकडून उलट बाजूने पकडून ओढल्यामुळे शेतकर्या चे प्राण वाचले. ही घटना आज दुपारी घडली असून तो शेतकरी जखमी झाला व त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. मगरीने हल्ला केलेल्या शेतकर्याघचे नाव महेश काटे असे आहे.

                                                                                           सातवे येथील महेश काटे हा आपल्या बैलाला घेऊन मशागतीसाठी गेला होता. शेतीची मशागत झाल्यानंतर तो दुपारी आपल्या बैलांना विश्रांतीपूर्वी पाणी पाजायला नदीवर गेला असता बैल पाणी पितांना तो बैलांना धुण्यासाठी पाण्याच्या पात्रात उतरला, यावेळी मगरीने त्याच्या डाव्या पायाला पकडून त्याला ओढायला सुरवात केली. पण तेवढ्यातच महेशच्या हाताला बैलचा दावा सापडला. पण बैल सुद्धा पाण्यात असल्याने त्याला बाहेर येणे शक्य होत नवते. परंतु तेवढ्यात महेश पाण्याच्या पात्रात जात असल्याने बैलाचा दावा पण ओढला जाऊ लागला त्यामुळे बैलानेआपला मोर्चा उलट दिशेने वळवला व महेशला ओढत बाहेर घेऊन आला. त्यानंतर महेशने आरडा ओरडा केल्यामुळे शेतातील काम करणारे शेतकरी जमा झाले. त्यांनी महेशला उपचारासाठी दवाखान्यात नेले.

तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारणार ‘मीना’,गूगलने केलं सुपर चॅटबोट लाँच.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *