बीयरची गाडी पलटली, मद्यप्रेमींना आनंद गगनात मावेना.

सध्या देशात लॉकडाउन चालू असल्यामुळे मद्यपींना दारू मिळणे खूप काढीन झाले होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने काही निकष ठेऊन दारू चालू केली तर मद्यपींनी दारू घेण्यासाठी लांबचलांब रांगा लावल्या होत्या. त्यामुळे मद्यप्रेमींसाठी दारू किती महत्वाची आहे हे समजून येते. त्यातच शिर्डीमध्ये बीयरची गाडी पलटी झाल्याने मद्यपींना जणू लॉटरीच लागली. अहमदनगर-मनमाड महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. हा अपघात झाल्यानंतर अनेकांनी बियरच्या बाटल्या लंपास केल्या. गुहा गावातील ही घटना आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाला किरकोळ जखम झाली आहे. गाडीमध्ये नेमका किती माल होता आणि किती रुपयांचं नुकसान झालं? याची माहिती पोलीस घेत आहेत.

पोलीस येत पर्यंत तळीरामांनी बीयरच्या शेकडो बाटल्या लंपास केल्या असून भरपूर दिवसानंतर दारू घशात उतरल्याने मद्यपींचा आनंद गगनात मावत नव्हता.

सोमवारी दारूविक्री सुरू झाल्यानंतर मंगळवारपर्यंत राज्यात अंदाजे ६२.५५ कोटी रुपयांची दारूविक्री झाली. मंगळवारपर्यंत अंदाजे १६.१० लाख लीटर दारूची विक्री झाली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्यातल्या १७ जिल्ह्यांमध्ये दारूविक्रीला सुरुवात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *