बिल गेट्स यांनी Microsoft’ला ठोकला रामराम, समाजसेवा करण्याचा मानस.

जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) संचालक मंडळावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. समाजसेवेला अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी बिल गेट्स यांनी हा निर्णय घेतला आहे. यामुळे Microsoft ची सर्व सूत्रे भारतीय वंशांच्या सत्या नडेला यांच्याकडे आली आहेत. जवळपास दशकभरापूर्वी बिल गेट्स यांनी Microsoft च्या दैनंदिन कामकाजातून अंग काढून घेतले होते. २०१४ मध्ये बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यानंतर ते संचालक म्हणून आजतागायत कायम होते. २००० साली त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. सत्या नडेला हे Microsoft चे प्रमुख बनले होते.

भविष्यात तंत्रज्ञानातील बदलांचा वेध घेऊन बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना केली होती. जगाला सॉफ्टवेअर उपलब्ध करण्याचे स्वप्न त्यांनी पहिले होते. नुकताच बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने करोना विषाणू रोखण्यासाठी लाखो डाॅलर्सची मदत केली होती.जगप्रसिद्ध बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन या समाजसेवी संस्थेला अधिकाधिक वेळ देण्यासाठी बिल गेट्स यांनी संचालक मंडळानरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. बिल यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य समजतो, त्यांचे काम नेहमीच प्रेरणादायी राहिले, अशी भावना सत्या नडेला यांनी गेट्स यांच्या निर्णयावर व्यक्त केली.

मोठी बातमी..! राज्य सरकारचे आर्थिक व्यवहार राष्ट्रीयीकृत बँकांमार्फतच ,१ एप्रिलपासून खासगी बँकांतील खाती बंद करण्याचे आदेश

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *