बिल गेट्स म्हणाले “वेल डन मोदीजी”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात करण्यात आलेल्या उपाययोजना व वेळेवर घेतलेले योग्य निर्णय यामुळे भारताची लोकसंख्या १३० कोटी असून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला नाही. भारताने वेळीच लॉकडाऊन घोषित करून कोरोनासाठी ठरत असलेले हॉटस्पॉट सिल केले. नागरिकांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. या सर्व निर्णयांमुळे जगातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी भारताच्या या कामगिरीची प्रशंसा केली आहे. 
कोरोणा विरुद्धच्या लढाईत भारताने केलेल्या उपाययोजनांसाठी बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून कोरोना विरुद्धच्या लढाईत तुमच्या सरकारने योग्य पाऊले उचलली. हे कौतुकास्पद आहे.असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाने अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला. आवश्यक तो परिसर सिल केला जातोय. तुमची आरोग्य यंत्रणा सक्षम केली जात आहे.  भारताने आपल्याकडे असलेल्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा योग्य वापर केला त्यामुळे आनंद आहे. सरकार द्वारे लाँच करण्यात आलेलं सेतू अॅप कोट्यवधी लोकांनी डाऊनलोड केलं असून तुम्ही ज्या भागात राहता तो भाग किती सुरक्षित आहे हे दिसतय. तुम्ही आपल्या नागरिकांच आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा यामध्ये संतुलन राखलं आहे. भारत उत्तम नेतृत्वात सुरक्षित आहे हे तुम्ही दाखवून दिलं असंही ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *