बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूमध्ये, केरळ सरकारचा निर्णय.

पाणी हा जगण्यासाठी आवश्यक घटक आहे. बाहेर किंवा प्रवासात जाताना बहुतेक जण पाण्याची बाटली जवळ ठेवतो; पण बाहेरचे पाणी पिण्याची वेळ आली तर अनेकदा पाणी कसे असेल, याबद्दल साशंकता मनात निर्माण होते. म्हणूनच, स्वच्छ पाण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर सर्रास होता. यातूनच पाण्याच्या विक्रीत नफेखोरी होताना दिसते. या गोष्टी टाळण्यासाठी केरळ सरकारने बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्ययक वस्तू कायद्यामध्ये केला आहे. तेथे पाण्याच्या एका लिटरच्या बाटलीची किंमत सध्या २० रुपये असून ती सात रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे १३ रुपयांपेक्षा जास्त किमतीला पाण्याची बाटली विकू नये, असा आदेश नागरी अन्नपुरवठा विभागाने दिला आहे. याशिवाय बाटल्यांवर नवी किंमत छापण्याचीही सक्ती केली आहे.
बाटलीबंद पाण्यासाठी अव्याच्यासवा किंमत आकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून आल्याने सरकारने हे पाऊल उचलून माफत दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.केरळ बाटलीबंद पाणी उत्पादक संघटनेचे म्हणणे असे आहे की, पाण्याच्या बाटलीची विक्री १२ रुपयांनी करण्याची तयारी त्यांनी दोन वर्षांपूर्वीच दाखविली होती; पण संघटनेच्या काही सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला होता. ‘‘११-१२ रुपयांना पाण्याची बाटली विकण्याच्या प्रस्तावास स्थानिक व्यापाऱ्यांनीही विरोध केला होता. आता बाटलीबंद पाण्याचा समावेश जीवनावश्यऱक वस्तूंमध्ये केल्याने किंमत कमी करणे शक्य झाले आहे,’’ असे अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री पी. तिलोत्तमन यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडिया, वर्धा भरती २०२०

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

राजकीय वर्तुळातील मोठी बातमी, ज्योतीरादित्य शिंदे (सिंधिया) यांचा कॉंग्रेसला रामराम..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *