बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी तर्फे गरजूंना जीवनावश्यक किराणा कीटचे वाटप.

वनसडी :
संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने अनेक लघु  व्यावसायिक व मजुराना घरीच बसून राहावे लागत आहे . त्यामुळे अनेकांच्या हक्काचे गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे याकरिता वनसडी येथील बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक व कर्मचारी यांनी आपल्या पगारातून पैसे गोळा करून छत्तीसगड येथील नऊ मजूर व गोंडपीपरी येथील सहा मजूर हे लॉकडाऊन मुळे वनसडी येथे अडकून आहे त्यांना किराणा किट देण्यात आली आहे.

सदर उपक्रमाला कोरपना पंचायत समितीच्या उपसभापती सिंधुताई आस्वले, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक मंझुर हुसेन, वनसडीच्या सरपंच ललिता गेडाम, उपसरपंच सुधाकरराव पिंपळकर, राजाबाबू  गलगट , बँकेचे कर्मचारी दिनेश शेंडे , प्रेम नंदनकर ,अनिमेश भट्टाचार्य ,  निखिल धुर्वे,विवेक निशाणकर, अण्णाजी काळे,पत्रकार डॉ कवडू पिंपळकर इत्यादी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *