फादर्स डे च्या दिवशीची बाप लेकाचा नदीत बुडून मृत्यू.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील वाघाडी नदीच्या पात्रात काल बाप लेकाचा बुडून मृत्यू झाला. संजय शिवप्रसाद अग्रहारी व त्यांचा मुलगा आदित्य संजय अग्रहारी असे मृतकांचे नाव आहे.

काल सूर्यग्रहण असल्यामुळे विधी करण्यासाठी संजय अग्रहारी व संजय सोयरे यांचे कुटुंब वाघाडी नदीच्या पात्रा जवळ गेले होते. दोन्ही कुटुंबाची पूजा झाल्यानंतर अंघोळ करण्यासाठी गेले असता सर्व जण बुडत असल्याचे लक्षात येताच सोबत असणाऱ्या नागरिकांनी आरडा ओरडा चालू केला. त्यावेळी जवळच असलेल्या भोयर यांनी बचावासाठी नदीच्या पात्रात उडी घेतली मात्र सुभाष सोयरे व एका लहान मुलाला वाचवण्यात त्यांना यश आले. तर संजय शिवप्रसाद अग्रहारी व त्यांचा मुलगा आदित्य संजय अग्रहारी यांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलीस घटनस्थळी दाखल झाले व दोन्ही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. बाप लेक बुडल्याची घटना वाऱ्यासारखी पसरल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच फादर्स डेच्या दिवशी बाप लेकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *