प्रेमासाठी काहीपण…! प्रियसीला भेटण्यासाठी मुंबई ते सिंधदुर्ग पायी प्रवास.

‘प्रेमात आणि युद्धात सर्व काही चालतं’ हे व्यक्तव्य ज्याने म्हटलं जातं, या विचारांना शोभेल अशीच घटना एका प्रियकराने केली आहे. आपल्या प्रियसीचा विरह सहन न झाल्याने प्रियकराने आपल्या प्रियसीला भेटायला जाण्यासाठी मुंबई ते सिंधदुर्ग प्रवास चक्क पायी केला आहे. आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी लॉकडाउन ची बंधने तोडून पोलिसांचे पहारे चुकवत तो मुंबई वरुण सिंधदुर्गला आला.

मूळ सिंधदुर्गातील असणारी ‘ती’ आणि तो प्रियकर मागील एक वर्षापासून एकत्र राहत होते. लवकरच दोघे लग्न करणार होते. मात्र अचानक लॉकडाउन ची घोषणा झाली आणि होळीसाठी आपल्या गावाला आलेली प्रियसी गावातच अडकली….. मग काय आपल्या प्रियसीचा विरह जास्त कल सहन न झाल्याने तिला भेटण्याकरिता त्याने चक्क सिंधदुर्गला पायी जाण्याचं निर्णय घेतला आणि पायी चालत तो सिंधदुर्गला पोहचला. गावसोडून दोघांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा देखील सुरक्षीतपणे पार केली. पण, लांजामध्ये शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी थांबलेल्या या दोघांवर पोलिसांची नजर पडली आणि मग चौकशीअंती सारी कहाणी उघड झाली. व त्यांना दोघांना लांजा इथं क्वारंटाईन करण्यात आलंय. लॉकडाउनमुळे अनेक प्रेमी जोडप्यांची अवस्था “मैं यहाँ तू वहाँ ज़िंदगी है कहाँ” अशी झालेली आहे. परंतु प्रेमासाठी काहिपण करणार्‍या या जोडप्याची चर्चा कोकणात चांगलीच रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *