‘ पैसे नकोत जागेच्या बदली जागा हवी’ , विरुर वासीयांचा आक्रमक पवित्रा.

जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न वस्त्र निवारा ह्या तीन मूलभूत गोष्टींची गरज मानवाला जीवन जगताना लागतात त्याच गरजा उपलब्ध नसेल तर जगायचं कसं हा प्रश्न प्रत्येकाला पडतो तसाच प्रश्न वेकोली प्रशासनाच्या मनमानी कारभमुळे विरुर वासीयांनावर पडला आहे  निवाऱ्याची प्रतीक्षेत असणाऱ्या विरुर गाडेगाव वासीयांचा पैनगंगा वेकोली प्रशासन दखल घेत नसल्यामुळें  अनेक समस्यांना सामोरी जावे लागत आहे. विरुर हे गाव वेकोली खाणी मुळे प्रसिद्धीस आले असले तरी समस्या च्या डोंगरांमुळे विरुर वासीय हैराण असून वेकॉली प्रशासनाचा मनमानी कारभरामुळे गावकरी त्रस्त झाल्याचे चित्र आहे. विरुर गाडेगाव येथील पैनगंगा वेकोली प्रशासनाने येथील नागरिकांच्या घराची जागा नमुना ८ अ भुसंपादित करून तितकीच जागा पुनर्वसन करून उपलब्ध करून द्यावी अन्यथा संपूर्ण गाव आंदोलनाच्या पवित्र घेईल असे मत सरपंच सुभाष दाळे यांनी माध्यमांशी बोलतांना संगीलते आहे.

गेल्या कित्येक दिवसांनपासून वेकोली प्रशासन व जिल्ह्या प्रशासनाशी आम्ही पत्र व्यवहार केला आहे परंतु आमच्या मागणीकडे वेकोली आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्याचे ही त्यांनी या वेळी सांगितले आहे. वेकोली प्रशासनातर्फे येथील घराच्या जमिनीचे नमुन ८ अ अंतर्गत भूसंपादन आम्हाला द्या मोबदल्यात पुनर्वसन करून तितकीच जागा उपलब्ध करून द्यावी जागेच्या मोबदल्यात आम्हाला तुटपुंज्या पैश्याची भीक नकोसं  जागेच्या बदली जागाच हवी असे निवेदन सुद्धा वेकोली व जिल्हा प्रशासनाला दिले २४/०२/२०२० ला गावकऱ्यांनी दिली आहे.

तुटपुंजी मदत देऊन जागा बळकावण्याच्या भीती ?

वेकोली प्रशासन नागरिकांच्या जागेची नमुन ८ नुसार जागा संपादित करून तुटपुंज्या पैश्याची रक्कम देऊन जागा बळकावून घेणार तर नाही नं अशीही भीती नागरिकांमध्ये पसरली आहे त्याच भीती पोटी जागे बदली जागेची मागणी नागरिक करीत आहे.

अनेकांना घराला तळे

गावातील अनेक नागरिकांच्या निवाऱ्याला ब्लास्टिंग मुळे तळे गेले असून  येथील नागरीक भीतीमय वातावरणात जीवन काढत आहेत. असे असली तरी सुद्धा प्रशासनाने वेकोली प्रशासन पुनर्वसन करण्यास सज्ज होणार तरी कधी  हा मोठा प्रश्न गावकऱ्यांन समोर ठाकला आहे .गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न कायमस्वरूपी ठप्प असून प्रश्नाने लक्ष द्यावेत अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

अंगावर घरे पडण्याची वाट पाहतो काय प्रशासन? 

वेकोली सुरू झाली त्यातच खदानीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाली त्याचा फटका देखील गवतील नागरिकांना होत आहे. रोज होत असलेल्या खदानीचा ब्लास्ट मुळे गाव दनानल्या जात आहे एवढेच नहीं तर रोजच घरातील भांड्याचा आवाज येत आहे. खदान दिवसेंदिवस गावालगत येत असल्याने त्याचा फटका मानवा सोबत त्यांचा घरालाही भेगा पडल्याचे निदर्शनास येत आहे.कित्येक घराला तळे गेले असून सुद्धा पुनर्वसन झाले नाहीत त्या मुळे घरात वास्तव करणाऱ्या विरुर वासीयांचा जीव धोक्यात असल्याने घरे पडून जीव गेल्यावर पुनर्वसन होणार का ?

गावातील नागरिकांची पुर्नवसनाचा मुद्दा अजूनही रेंगाळत असून नमुना ८ अ प्रमाणे संपादित करून तितकीच जागा पुनर्वसनात द्यावी संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्यात पैसे नकोत तर जागाच हवी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही आंदोलन करू.

सुभाष रघुनाथ दाळे
सरपंच ग्रामपंचायत विरुर गाडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *