पॅन-आधार जोडण्याची शेवटची संधी, न जोडल्यास दंड बसणार ?

पॅन आणि आधार जोडण्यासाठी अवघ्या २८ दिवसांचा कालावधी उरला आहे. पॅन आधारला न जोडल्यास पॅनकार्ड निकामी होईल अशी सूचना आधीच प्राप्तीकर विभागाकडून देण्यात आली होती. तरीही १७.५८ कोटी पॅनकार्ड धारकांनी अजूनही पॅन आधारला जोडला नाही. त्यामुळे आता पॅन आधारकार्ड न जोडल्यास दंड थोठाविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्तीकर विभागाकडून देण्यात आली आहे.

प्राप्तीकर विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार ३१ मार्च २०२० पॅन व आधार न जोडलेल्या पॅनकार्ड धारकांकडून पॅनचा उपयोग केल्यास त्याला प्राप्तीकर कायदा कलम २७२ बी अन्वये १० हजारापर्यंत दंड थोटाविण्यात येणार आहे. आणि पॅन रद्द केल्यास संबधीतांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. बँकिंग व्यवहारात मोठी अडचण निर्माण होऊन आर्थिक व्यवहारावर पाणी सोडावे लागणारा आहे. या व्यतिरिक्त शेअर बाजार अथवा म्युचल फंड मध्ये गुंतवणूक करणार्यां ना मोठ्या नुकसानीला समोर जावे लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर पॅन – आधार जोडण्याचे आवाहन प्राप्तीकर विभागाकडून करण्यात आले आहे.

वेळोवेळी मुदतवाढ देऊनही अद्याप संपूर्ण लोकांनी पॅन-आधार ला जोडले नाही आहे. प्राप्तीकर विभागणे दिलेल्या माहितीनुसार २७ जानेवारी २०२० पर्यन्त ३०.७५ कोटी पॅन- आधार जोडण्यात आले आहे

कौतुकास्पद….! बीडमधील ७ वीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा पराक्रम..

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक टेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *