पुण्यात शिकणाऱ्या चंद्रपूर यवतमाळ येथील विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्याची व्यवस्था करा : हंसराज अहिर

पूणे येथे शिक्षण घेणाऱ्या  चंद्रपूर यवतमाळ येथील विद्यार्थांना  स्वगृही आनण्यासाठी शासनाने व्यवस्था करावी अशी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी पूणे येथे वास्तव्यास आहेत. देशात लाॅकडा़न चा कालावधी वाढल्याने पूणे येथील सर्व महाविद्यालय शिक्षण संस्था व शिकवनी वर्ग बंद असुन या विद्यार्थांना  लाॅकडाऊनमुळे सर्व प्रकारची प्रवास साधने बंद असल्यामुळे आपल्या स्वगावी येने शक्य नाही. पूणे येथे त्यांना एकाकी जगावे लागत असल्याने त्यांच्या पालकांमध्ये असलेल्या चिंतेची दखल घेऊन शासनाने त्यांना त्याच्या स्वगृही परत पाठवण्याचे व्यवस्था करावी अशी मागणी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

    या संदर्भात त्यांनी उत्तर प्रदेश सरकारने तेथील स्थानीक विद्यार्थांना  राजस्थान येथील हजारो विद्यार्थांना  स्वगृही पोहोचवन्याची व्यवस्था केल्याचे नमुद करून याच   धर्तीवर चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील पूणे येथे खितपत पडलेल्या विद्यार्थांना  स्वगृही आनण्याची राज्य शासनातर्फे व्यवस्था करावी असे उदाहरण देऊन सांगीतले. यापूर्वी रेल्वे मंत्रालयाला पत्रव्यवहार करूण मा. रेल्वे मंत्री श्री पियुष गोयल जी यांनी मुजुरी दिल्याने होळी निमित्ताने 3 मार्च व कोरोना स्थिती पाहुन 21 मार्च ला अशा दोन विशेष ट्रेन सोडल्याने हजारो विद्यार्थी चंद्रपूर व अन्य जिल्ह्यात स्वगृही पोहोचले होते हे विशेष. आता जे काही शैक्षणीक कारणाने येऊ शकले नव्हते असे विद्यार्थी ज्यात अल्पवयीन तथा एकटे-एकटे असल्याने त्यांना मानसिक तनावात ते तिकडे व पालक वर्ग इकडे तनावात जिवन जगत आहे. बहुतांश विद्यार्थी  पोहोचले होते आता उर्वरीत विद्यार्थांना  स्वगृही आनण्यासाठी अहीर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे विद्यार्थांना  स्वगृही आनण्याची सुचना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *