पहिल्याच दिवशी १० वी चा पेपर फुटला.

आजपासून इयत्ता १० वीची परीक्षा सुरू झाली असून पाहिल्याच दिवशी जळगावतील मुक्ताईनगर येथील कुर्‍हा या ठिकाणी अवघ्या १५ मिनिटातचं पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. अवघ्या १५ मिनिटातचं मराठीचा पेपर व्हाट्स अप वर पसरू लागला. गावातील झेरॉक्स सेंटर वर कॉपी झेरॉक्स काढण्यासाठी आल्याने पेपर फुटल्याची बातमी वार्‍यासारखी  पसरली.

कुर्‍हा येथील  शिवाजी माध्यमिक विद्यालयातील १०वी च्या परीक्षेच्या संचालकांनी दिलेल्या महितीनुसार जर पेपर फुटीचा प्रकार झाला असेल तर निश्चितपणे कायदेशीर कारवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक टेलीग्राम ग्रुप वर जाईन व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *