परदेशातील भारतीय नागरिकांना स्वदेशी आणण्यासाठी ६४ विमान उडणार.

कोरोनाच्या पार्श्व भूमीवर परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणण्यासाठी विमाने पाठवली जाणार आहे. ७ मे पासून १३ मे पर्यंत या नागरिकांना आणल्या जाणार असून यासाठी ६४ विमाने पाठवली जाणार असल्याची माहिती विमान वाहतूक मंत्री हरदिपसिंह पुरी यांनी दिली आहे.

जगात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने अनेक देशांत टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक भारतीय जेथे आहे तिथेच अडकले होते. सुरवातीच्या काळात काही नागरिक देशात परतले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून विमानसेवा बंद करण्यात आली होती. आता मात्र विदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना लवकरच भारतात आणण्यात येणार आहे. यासाठी ७ मे ते १३ मे या पहिल्या आठवड्यात ६४ विमानांची उड्डाणे होणार आहे.

कुठे व किती पाठविण्यात येणार पहिल्या टप्प्यात विमाने.

यूएई – १०
कतार – ०२
सौदी अरेबिया – ०५
यूके – ०७
सिंगापूर – ०५
युनायटेड स्टेट्स -०७
फिलीपिन्स -०५
बांगलादेश – ०७
बहरैन -०२
मलेशिया -०७
कुवैत -०५
ओमान -०२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *