परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी आजपासून मिशन वंदे मातरम् ला सुरवात.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच शांततेच्या काळात एक खूप मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे. विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात टाळे बंदी करण्यात आली होती. त्यामुळे भारतातील नागरिक परदेशात होते ते तिथे अळकले. भारतात विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती आता परदेशात अडकलेल्या लोकांना स्वदेशी आणण्यासाठी ‘मिशन वंदे मातरम’ ला आजपासून सुरुवात होत आहे यासाठी भारतीय नौदलाची सर्व जहाजे विमाने सज्ज झालेली असून आज या मिशनची सुरुवात होणार आहे.

या मिशन दरम्यान 15000 भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यात देशात आणण्यात येणार असून प्रवाशांचे मेडिकल स्क्रीनिंग करूनच त्यांना देशात आणल्या जाणार आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना किंमत मोजावी लागणार असून त्यांच्याकडून तिकीट घेतल्या जाणार आहे. याशिवाय त्यांना आरोग्य सेतू घेणे बंधनकारक असून भारतात आल्यानंतर त्यांची मेडिकल टेस्ट घेण्यात येईल व ज्यांना विषाणूचा संसर्ग झाला नसेल त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. या मिशनसाठी एकूण 64 विमानांपैकी 10 विमानं यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलिपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये उड्डाण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक बंद झाल्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात हे भारतीय अडकून पडले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *