पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द, आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल : मुख्यमंत्री

राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन हा शब्द कचरा पेटीत टाकायला मी आलो आहे. मात्र, हा लॉकडाऊन एकमद उठवण्यात येणार नसून हळूहळू उठवण्यात येणार आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे काही लोक म्हणतात, त्यांनी आकडेवारी पाहावी असे, आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना आवाहन केलं. यावेळी त्यांनी राज्यातील आकडेवारी सर्वांसमोर सादर केली.
आधीच्या सेमिस्टरमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून तितके गुण विद्यार्थ्यांना दिले जातील. कारण सध्या परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही. पुढे परीक्षा कधी घेता येतील याची कल्पना नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवण्यापेक्षा सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करायचे, असा निर्णय आम्ही घेत आहोत. जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर श्रेणीसुधार करण्याची संधी देण्यात येईल,’ असे ठाकरे यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *