पत्रकार बंधुंनो तुम्हींही स्वतःची काळजी घ्या.

सध्या देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध भागात माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार हा सतत धडपड करत असतो. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाच्या फोडणारा पत्रकार सध्या आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचवत आहे. सर्वांना घरी थांबा अशी हाक देणाऱ्या पत्रकारांना मात्र बातमीसाठी बाहेर निघावेच लागते.

त्यातच आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई मधील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात सर्वसामान्यांना माहिती देणाऱ्या १६७ पत्रकारांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यातील ५३ पत्रकारांची रिपोर्ट पोझीटीव्ह आला आहे. त्यामुळे बातमीच्या शोधात असणाऱ्या पत्रकार बंधूंनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात कोरोनाची चाहूल लागली तेव्हापासूनच पत्रकारांनी अगदी ग्राउंड लेवल वर काम केले. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांनी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पत्रकार हा जन व प्रसार माध्यमातील दुवा असून जनमध्यमाच्या साहाय्याने प्रत्येकाच्या घरा घरात महिती पोहचविणार पत्रकार सुद्धा आज कोरोनाशी लढणारा योद्धा आहे.

” प्रसार माध्यमातून पत्रकार आपल्या जीवाची परवा न करता देशातील प्रत्येक कोपऱ्यातून माहिती पोहचविण्याचे काम करीत आहे परंतु त्यांचा कुठलाही विमा शासनाने काढलेला नसून प्रसार माध्यमात काम करणाऱ्या स्थानिक वार्ताहर पासून  शासनाने पत्रकार बांधवाना विमा संरक्षण द्यावे. “

दिपक खेकारे
अध्यक्ष – कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *