पंतप्रधान मोदींचा संदेश, कोरोनाचा अंधार दूर करण्यासाठी ५ एप्रिलला दिव्यांचा उजेड करा.

सध्या देशात असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेशी संवाद साधला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी ५ एप्रिल रविवारला आपल्या घरात बसून दिव्यांचा प्रकाश करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करून आपल्या घरात मेणबत्ती, दिवे, टार्च, मोबाइल फ्लॅश लाइट लावून चारही दिशांना झगमगाट करा. हा प्रकाश आपल्या देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल असे ते यावेळी म्हणाले. परंतु हे सर्व करतांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात यावं हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हे आयोजन करतांना कोणीही एकत्र येऊ नये अथवा रस्त्यावर उतरून नये, सर्वांनी आपल्या घरातच अंधकारामध्ये प्रकाश करावा असे सांगितले आहे. यावेळी मोदी म्हणाले की, 22 मार्चला देशवासियांनी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रती केलेल्या धन्यवादाचे अनेक देश अनुकरण करत आहेत. यावेळी देशाच्या सामूहिक शक्तीचं दर्शन आपण दाखवलं. देश एक होऊन कोरोना विरोधात लढाई लढतोय. लोकडाऊनच्या काळात आपण आपण एकटे नाहीत. 120 कोटी देशवासियांची ताकत आपल्या सोबत आहेत, असं मोदी म्हणाले.देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत. ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं कसं लढू. लॉकडाउन असलं तरी कोणीही एकटं नाही. 120 कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. या शक्तीनेच आपल्याला कोरोनाला हारवायचं आहे असेही मोदी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा सज्जड दम, ‘घरात राहायचं की हॉस्पिटलमध्ये ठरवा ,आणि जे घरात थांबणार नाही त्यांना डांबणार तुरुंगामध्ये’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *