पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून कोरोना संकटासाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाशी संवाद साधला यावेळी त्यांनी कोरोणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी २० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये संघटित व असंघटित वर्गाला प्राधान्य दिले असून देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व मजुरांसाठी देखील पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रामाणिक कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी  देखील पॅकेजची घोषणा करण्यात आली. देशातील लघु उद्योग, कुटीर उद्योग तसेच लहान मोठ्या सर्व उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • कोरोणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी २० हजार कोटींचे पॅकेज.
  • देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी “आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा.
  • लॉकडाऊन ४.० ची घोषणा.
  • देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व मजुरांसाठी देखील पॅकेज जाहीर.
  • प्रामाणिक कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी  देखील पॅकेजची घोषणा
  • सर्व उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक पॅकेज घोषित.
  • कोरोना भारताला संधी घेऊन आल्याचे प्रतिपादन.
  • कोरोनामध्ये गरिबांच्या शक्तीचं दर्शन घडल्याचे प्रतिपादन
  • तळागळातील लोकांना कोरोनामुळे सोसावं लागल्याची खंत केली व्यक्त.

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला भारताकडून आशा असल्याचे देखील सांगितले. जगातील सर्वात उत्तम ‘ टॅलेंट ‘ भारताकडे असून भारत सर्व काही व सर्वोत्तम निर्माण करू शकतो. असे ते यावेळी म्हणाले. जगात आतापर्यंत ४२ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून ३ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे देखील त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गरिबांनी दाखविलेल्या शक्तीचे कौतुक देखील केले व गरीबांना कोरोणामुळे भरपूर सोसावं लागल्याची खंत देखील व्यक्त केली. तसेच त्यांनी कोरोनाच्या पार्श्व भूमीवर तयार करण्यात आलेल्या स्वदेशी मास्कची देखील प्रशंसा केली. देशात आजपर्यंत मास्क ची निर्मिती व पीपीई निर्मिती होत नव्हती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची निर्मिती देशात चालू केला नाही आजच्या घडीला दररोज दोन लाख मास्क व दोन लाख पीपीई ची निर्मिती होत आहे. याचादेखील उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. लॉकडाऊन ४.० संबंधी सर्व राज्यांकडून सूचना मागविण्यात आल्या असून लॉकडाऊन ४.० बाबतची माहिती १८ मे पूर्वी देण्यात येईल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *