पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज सकाळी 10 वाजता चर्चा करणार आहे. सध्याच्या देशातील परिस्थितीचा आढावा घेऊन आज देशातील लॉकडाउन संबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेल्या नवीन नियमावली बाबत देखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेले लॉकडाउन समाप्त होण्याची तारीख जवळ आली असून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून पुढे काय करायचे याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात.

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत मुख्यमंत्र्यांसमवेत तीन मुख्य मुद्द्यांवर चर्चा करतील. पंतप्रधान राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती आणि नवीन कंटेन्ट झोन तयार होण्यापासून रोखण्यासाठी घेतलेल्या उपायांवर चर्चा केली जाईल. पंतप्रधान 20 एप्रिलच्या संदर्भात जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या गृह मंत्रालयाच्या पालनाविषयीही चर्चा करतील. या महत्त्वपूर्ण बैठकीत मेनंतर उचलल्या जाणार्याव पर्यायाबाबत चर्चा केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *