पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा लॉकडाऊन संबंधी मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या तिसरा लॉक डाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या समाप्तीची तारीख जवळ येत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. आज कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन पुढील काळात काय उपाययोजना कराव्या लागणार याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच लॉकडाऊन मुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही ठोस पाऊले उचलली जाऊ शकतात.
देशातील लॉकडाऊन वाढवून सुध्दा कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. तिसऱ्या लॉकडाऊनच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या ३९ हजार ९८० एवढी होती परंतु ती ६२ हजाराच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे आता समोर लॉकडाऊन वाढवायचे की उपाययोजना करायची त्यासंबंधी आज चर्चा होणार आहे.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी, केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बठक घेऊन राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. या बठकीत स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासंदर्भातही माहिती देण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी गेल्या आठवड्यात शेती, वित्तीय क्षेत्र, वीज, शिक्षण, विमान वाहतूक आदी विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींशी उच्चस्तरीय बठका घेतल्या. त्यामुळे आजच्या या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *