नोकरी (खू) येथे विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

नोकरी खुर्द येथे विविध विकास कामांचे उद्घाटन तथा भूमिपूजन सोहळा पार पडला.  त्यामध्ये संपूर्ण गावात सी सी टी वी कॅमेरे,व्यायाम शाळा, गावातील लोकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी जलशुद्धीकरण सयंत्र ( वॉटर फिल्टर ), ग्रिड सोलार पॅनल, व आदिवासी सिंबोल चे भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबतच हळदी कुंकू व वाण वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद चंद्रपूरचे सभापती सुनील उरकुळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून नोकरीच्या सरपंच सौ लताताई उइके तर प्रमुख पाहुणे म्हणून सतीश भाऊ धोटे , मंगेश श्रीरामे, अनिल दुबे, अंबुजा फौंडशन च्या सरोज मॅडम, उपस्थित होते. सादर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच वामन जी तुरानकर यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन पिंपळशेंडे सरांनी केले. हळदी कुंकूवाचा कार्यक्रम हा शांती महिला ग्रामसंघ व सौ. माधुरी वामन तुराणकर यांच्या कडून घेण्यात आला.या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात स्त्रिया उपस्थित होत्या. तसेच उद्घाटन तथा भूमिपूजन  कार्यक्रमाला गावातील लिंगू येरमे, दौलत नैताम, भिवाजी शेंडे, कर्णू आदे, भीमराव परचाके, संजय राठोड, देवरव ढोले,सौ. कौशल्य परचाके, कुंदाताई कोटेवर,रेखाताई नले,सौ.निलीमा खोब्रागडे, गीरजाबाई मडावि , सिंधू ताई हजारे व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *