निर्भया बलात्कार प्रकरण…! २२ मार्च ला फाशीवर लटकणार चारही आरोपी.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणार्‍या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना २२ मार्चला सकाळी साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. चारही आरोपींची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली असून आता त्यांच्या फाशीबाबत नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

पवन गुप्ता , मुकेश सिंह, अक्षय ठाकुर, आणि विनय शर्मा यांनी ७ वर्षापूर्वी दिल्लीतील २३ वर्षीय पॅरामेडिकल ची विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील एका आरोपीने कारागृहातच आत्महत्या केली होती व एक आरोपी अल्पवयीन असल्याने कोर्टाने त्याला तीन वर्षाची शिक्षा देत तत्याची रवानगी बालसुधारगृहात केली. त्या प्रकरणाची संतप्त लाट संपूर्ण देशात पसरली होती. त्यानंतर चारही आरोपींच्या पुनर्विचारच्या याचिका सुप्रीम कोर्टाद्वारे फेटाळण्यात आल्या होत्या. आणि राष्ट्रपतींनी देखील दया याचिका फेटाळली त्यामुळे त्यांना आता फाशी देण्यात येणार आहे.

मोठी बातमी ..! करोनावर औषध सापडल्याचा ‘चीनचा’ दावा.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक , ट्विटर  टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *