नितिन गडकरींना चक्क ‘सर्वोच्च’ न्यायालयाकडून निमंत्रण….!

केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांची कार्यप्रणाली ही सर्वात वेगळी आहे. ते नेहमी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन आयडिया वापरुन कामे करत  असतात त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे त्यांचे पक्षाबाहेरही चाहते आहे.

        सार्वजनिक वाहने आणि शासकीय वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरीत करण्यासंदर्भात आज सर्वोच न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी केंद्र शासनाने चार आठवळ्याचा अवधी मागितला आहे. यासोबतच खुद्द ‘सरन्यायाधीश’ यांनी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी येऊन कुठे अडचणी येत आहे. हे सांगावे असे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले.

सध्या  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी स्वीडन दौर्यायवर आहे. त्यांना जर न्यायालयात बोलविले तर त्याचा राजकीय परिणाम होईल. असे अतिरिक्त महाधिवक्ता म्हणाले. यावर हा कोणताही आदेश नसून हा एक प्रस्ताव आहे असे सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले. हा कोणत्याही प्रकारचा समन्स नसून हे एक निमंत्रण आहे. केंद्रीय परिवहन मंत्र्यांना या इलेक्ट्रिक वाहनांच्या योजनेची त्यांच्या अधिकार्‍यांपेक्षा जास्त महिती असेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.
स्वयंसेवी संस्था सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन कॉमन कॉज आणि सीताराम जिंदाल फौंडशन एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले की शासनाने सार्वजनिक व सरकारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांत रूपांतरीत धोरण पुरेसे नाही. त्यावर जेष्ठ वकील यांनी ही योजना वायुप्रदूषण रोखण्यासाठी आणि कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी असल्याचे संगितले.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या टेलीग्राम  चॅनल ला जॉईन करा
येथे क्लिक करा ↓
घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *