नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी`.

नमस्कार मित्रांनो चांदा टू बांदा या साइट च्या माध्यमातून रोज नव नवीन माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहचवत असतो. नियमित नव नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या साइटला भेट द्या. व आमच्या फेसबूक पेजला लाइक करा.
पुण्यातील बालेवाडी येथे पार पडलेल्या ६३व्या कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन ने लातूरच्या शैलेश शेळकेवर ३-२ने विजय मिळवत यंदाचा महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला आहे. या स्पर्धेत अनेक सामने चित्तथरारक, रोमहर्षक ,व अटातटीचे झाले त्या मधून नाशिकचा हर्षवर्धन व लातूरचा शैलेश यांनी अंतिम फेरीत मजल मारली. त्यामध्ये हर्षवर्धन ने शैलेशचा पराभव करून महाराष्ट्रचे केसरी चा मानकरी ठरला. हर्षवर्धनचा विजय होताच मैदानात एकच जल्लोष करण्यात आला, हर्षवर्धनेही खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवत उपविजेत्या शैलेश शेळकेला खांद्यावर घेऊन त्याच अभिनंदन केल. दोस्तीत किसती नाही, मात्र कुस्तीत दोस्ती नाही अस म्हटलं जात, याचे दर्शन या दोन्ही खेळाडुंनी यावेळी सर्वांना घडवलं.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.
       कोण आहे हर्षवर्धन ?
·        हर्षवर्धन हा नाशिकचा पैलवान आहे. त्याचे वडील क्लर्क आहे
·        आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे.
·        काका पवारांचा शिष्य म्हणून पण त्याची ओळख आहे.
·        मॅटवरच्या कुस्तीचा तगडा अनुभव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *