नाभिक समाज बांधवांचा विविध मागण्यांसाठी तहसील कार्यावर मूक मोर्चा.

मागील तीन महिन्यापासून देशभरातच नाही तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कोरोनाच्या महामारीने थैमान घातला आहे. याचा प्रभाव सर्व गटातील नागरिकांवर पडला आहे त्यात अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक असलेला नाभिक नाभिक समाज सुद्धा भरकटले गेला आहे. सतत सलुन दुकान बंद असल्याने व्यवसायिक व कारागीर यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरीदेखील व्यवसायिक व कारागीर शासनाचे निर्णयाचे पालन करीत आहे. सलुन दुकान बंद असल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे कुटुंबाचे उदरनिर्वाह कसे चालवायचे हा सामंजस्य प्रश्न त्यांच्यापुढे उभा थाटला आहे.

१) शासनाने सलून व्यवसायिकांना आर्थिक पॅकेज द्यावे.
२) शासनाने सलून व्यावसायिकांचे भाडे व विद्युत बिल माफ करावे.
३) स्वतःच्या व ग्राहकांच्या सुरक्षेकरिता शासनाकडून पी पी इ किट पुरवण्यात यावी.

अशा विविध मागण्या घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यांनी गांभीर्य ओळखून लगेच पत्र माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना पाठविले व ओ सी प्रत के टी रामटेके यांच्या हस्ते देऊन मूक मोर्चा ची समाप्ती करण्यात आली

आम्ही देखील शासनाचे नियम पालन करून शासनाला नक्की सहकार्य करेल. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष कडूजी खोबकर यांनी दिला. यावेळी तालुक्यातील नाभिक समाज व सोडून असोसिएशनचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *