नागरिकांनो संयम बाळगा कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा: मा.आमदार अँड. संजय धोटे

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण सध्यास्थितीत हलबल आहेत. केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागु करून जवळपास ३९-४० दिवस होत आहे. केन्द्र सरकारने रेड झोन ,आरेंज झोन ,व ग्रिन झोन असे विभाजण करून जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर , सोलापूर, सातारा, ठाणे,पालघर,नाशिक, औरंगाबाद, धुळे ,जळगाव, अकोला, यवतमाळ ,या ठिकाणी सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. या शहराला रेड झोन घोषित केलेले असून उर्वरित आरेंज व ग्रिन झोन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील लगतचे क्षेत्रात याचा सिरकाव झाल्याने आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तरीही आपण घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. प्राप्त माहिती नूसार सध्याच्या स्थितीत चंद्रपूर मध्ये एक रुग्ण पॉझीटिव्ह आहेत. त्यावर मात करून आपण ग्रिन झोन मध्ये कसे येता येईल यांच्या प्रयत्न प्रशासन करित आहेत. आपण स्वतःची काळजी घेऊन घरात सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन करीत आहेत.

आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण जगात  कोरोना मुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला व जगातील अनेक विकसित देश सुध्दा या कोरोनाच्या प्रकोपातून सुटले नाही. या पूर्वी चंद्रपूर मधे एक ही रूग्ण नसल्याने आपल्या सर्वांच्या मनात खूप आनंद होता. लॉकडाउनच्या काळात आपण सर्वांनी संयम धरुन आपापल्या घरी राहून अतिशय उत्तम प्रकारे या लॉकडाउनच्या आदेशाचे पालन केले. पण लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रपूर मधे पहिला कोरोना रूग्ण आज आढळल्याने चंद्रपूर च्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण आपण कुणीही न घाबरता संयम व सतर्कतेचा वापर करून कोरोना विरुद्ध लढा द्यायची वेळ आली आहे. मी माझ्या समस्त बंधू भगिनींना युवा मित्रांना आवाहन करतो की जे कोणी कोरोना रूग्णाच्या संपर्कात आलेले आहे त्यांनी स्वतः होऊन स्वतःला कोरोंटाईन करावे आणि स्वतः जबाबदार नागरिक बनून इतरांची सुद्धा काळजी घ्यावी. तसेच जिल्ह्यात यानंतर एकही कोरोना रुग्ण वाढू नये ही प्राथमिक जबाबदारी आपण सर्वांनी-सर्वांच्या सहकार्याने स्वीकारावी. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांनी स्वतः चे हित समजून घरात रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा यातच सर्वाचे हित आहे. राज्यातील व प्ररराज्यातील नागरिकांना तथा बाहेर गेलेल्या व येणाऱ्या कामगार रोजमजुराना आपआपल्या कार्यक्षेत्रात पाठविण्याचे काम करीत असून ते आपले कार्य योग्य रित्या पार पाडताना त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करित आहेत. तसेच आपल्या गावात किंवा शहरात आपल्या जवळील भागात कोणीही आढळून आले असता याची माहिती देणे हे देखील आपले कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या परिसरात बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती द्यावी. व आपल्या क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव होणार नाही याची काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *