नव्या पिढीला भाईगिरीचे लागत आहे वेड, वेळीच आळा गरजेचा.

अमोल मिंचे ( प्रेस रिपोर्टर )

सध्याची तरुण पिढी खूप फास्ट आहे. त्यांना सध्या सोशल मीडिया, नवनवीन गेम्स, फॅशनेबल राहणीमान, आणि त्यासोबतच भाईगिरी करण्याचे वेळ लागत आहे. त्यामुळे त्यांना वेळीच रोखणे आवश्यक आहे. नाहीतर समोरच्या पिढीवर याचे गंभीर परिणाम होणार आहे. एखाद्याचा वाढदिवस राहिला तर मोठ्या संख्येत मुलांना गोळा करणे मग आपला वाढदिवस रस्त्यावर साजरा करणे. मोठ्या तलवारीने केक कापणे. असा ट्रेंड सध्या पाहायला मिळतो. परंतु ही आपली संस्कृती नाही.

परवाच झालेली घटना पण रस्त्यात वाढदिवस साजरा रस्त्यात केक कापत असतांना दुसर्‍याने आपल्याला गाङी पुढे न्यायची म्हणुन हॉर्न वाजवला तर तलवारीने वार केला आणी त्याचे जीवन संपविले.  यात त्या गाडी चालविणार्‍याची काहीही चूक नाही. मात्र समाजात वास्तव्य करणार्‍या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे कोणतीही चूक नसतांना त्या गाडी चालकाचा मृत्यू झाला. अशा या गुंड प्रवृत्तीला लवकर आळा घालणे आवश्यक आहे. नाही तर कधीतरी अशीच वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते. आपणही रस्त्यावरून कधी कधी आपणही दुसऱ्या गावात जातो.  दुसऱ्या जिल्ह्यात फॅमिलीसहित फिरायला जातो आपल्यालाही अश्या प्रसंगांना सामोरे जावे लागु शकते म्हणुनच असे जे कायदा न मानता दुस़ऱ्याची हत्या करणारे मुळातच “हा आमचा एरिया आहे, हम कुछ भी करेंगे” रस्त्यात तलवारीने केक कापणाऱ्या प्रवृत्ती यांचे विरूध्द कठोर कार्यवाही होणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टीतुन कायदा मोङण्याची सवय लागते आणी मग कायद्याला मुळीच न जुमाणणारी लोकांची झुंङ तयार होते. मग त्यांना सवयच जङते बस थोङेसे कारण असले कि हे लगेच दगङफेक करणे बसेस जाळणे अश्या प्रवृतीचे लोक सर्व समाजाला भविष्यात जास्त धोकेदायक ठरू शकतात. म्हणुनच अगदी छोट्या गुन्ह्यांसाठी पण कठोर कायदे करून जास्त शिक्षेची तरतुद सरकारने करायला हवीय आणी सरकार जेव्हा असे कठोर कायदे करून गुन्हेगार ठरू शकणाऱ्या प्रवृतीला आळा घालण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा लोकांनी सरकारला त्यात साथ दिली पाहिजे. सामान्य जणांच्या गुन्हेगारांपासुन भयमुक्त जीवनासाठी हे आवश्यक आहे.

“चांदा टू बांदा” हा एक उत्तम ऑनलाइन पोर्टल असून  याद्वारे पेपर वाचकांना एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. चांदा टू बांदा या न्यूज पोर्टलला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा… 

श्री.निवृत्ती गिते (दै.पुण्यनगरी प्रेस प्लांट औरंगाबाद)

One Comment on “नव्या पिढीला भाईगिरीचे लागत आहे वेड, वेळीच आळा गरजेचा.”

  1. कठोर कायदे करून गुन्हेगारांना शिक्षा केली जावीयासाठी नागरिकांनी सरकारला विनंती व तसे करण्यासाठी सरकारला बाध्य केले पाहिजे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *