धक्कादायक…! उपचाराअभावी चिमुकल्याचा आईच्या कुशीतच मृत्यू.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन चालू आहे. लॉकडाऊन दरम्यान अनेक दुर्दैवी घटना समोर आल्या आहे. त्यातच अशीच एक घटना बिहारमधील जहानाबाद समोर आली आहे. अंबुलन्स न मिळाल्याने एका चिमुरड्याला आपले प्राण गमवावे लागले आहे. प्रशासनाच्या बेजबादारपणामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. जहानाबाद सदर रुग्णालयात हे हृदय पिळवटून टाकणारं दृश्यं पाहायला मिळालं. अरवल जिल्ह्याच्या कुर्था भागातील शाहपूर गावचा रहिवासी असलेल्या गिरिजेश कुमार यांचा तीन वर्षांचा चिमुरडा ऋशु गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. खोकला आणि तापानं तो जखडला होता. १० एप्रिल रोजी त्याची तब्येत आणखीनच खालावली. यावेळी गिरिजेश आपल्या पत्नीसोबत ऋशुला घेऊन कुर्था प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहचला. ऋशुची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला अरवल सदर रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. परंतु अंबुलन्स उपलब्ध न झाल्यामुळे व लॉकडाऊन चालू असल्याने जाण्यासाठी कोणत्याही साधनाची उपलब्धता न झाल्यामुळे सदर चिमुकल्याला आपले प्राण गमवावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *