देशात आजपासून तिसर्‍या लॉकडाउनला सुरवात.

देशात कोरोनाची वाढती संख्या पाहत केंद्र सरकार कडून तिसर्‍या लॉकडाउन ची घोषणा करण्यात आली होती. तिसर्याा लॉकडाउनला आज पासून सुरवात झाली असून हे लॉकडाउन १७ मे पर्यंत चालणार आहे. सध्या भारतात कोरोना बाधितांची संख्या ४२५३३  एवढी असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची सख्या ११७०६ एवढी आहे.

केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील 130 जिल्हे रेड, 284 जिल्हे ऑरेंज आणि 319 जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहे. देशातील सर्व मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत. यामध्ये वेगवेगळ्या झोन मध्ये काही गोष्टींना शिथिलता देण्यात आली आहे.

कुठे काय सुरू राहणार ? काय बंद राहणार ? 

ग्रीन झोन :- 
                     खाजगी कार्यालयात ३३ टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सुरू राहणार असून सरकारी कार्यालयात उपसचिव व त्यावरील कर्मचार्‍यांची १०० टक्के उपस्थिती राहणार तर त्याखालील कर्मचार्‍यांची उपस्थिती ३३ टक्के राहील. बस सेवा सुरू होणार असून ५० टक्के प्रवासी क्षमता तत्वावर बससेवा सुरू राहणार.तसेच ती बस केवळ ग्रीन क्षेत्रातच असणार बाहेर जाता येणार नाही. तसेच सर्व या झोन मध्ये सगळचं सुरू करता येणार आहे.

ऑरेंज झोन :-
                       या झोन मध्ये बस वाहतुन बंद राहणार असून टॅक्सी व रिक्शा सुरू राहणार आहे. एक वाहक केवळ दोनच प्रवासी घेऊन जाऊ शकणार आहे. खाजगी कार्यालयात ३३ टक्के कर्मचार्‍यांच्या  उपस्थितीत सुरू राहणार असून सरकारी कार्यालयात उपसचिव व त्यावरील कर्मचार्‍यांची १०० टक्के उपस्थिती राहणार तर त्याखालील कर्मचार्‍यांची उपस्थिती ३३ टक्के राहील. अत्यावश्यक सेवासह आता दुकाने सुरू होणार आहे मात्र मॉल्स मात्र बंद राहतील.

रेड झोन :- 
                    यामध्ये बस रिक्शा, टॅक्सी बंद राहणार आहे. तसेच सलून देखील बंद राहणार आहे. ग्रामीण भागातील दुकाने सुरू करता येणार असून त्यांना नियम पाळण्याची सक्ती केलेली आहे. रेड झोनमधील महापालिका क्षेत्र मुंबई, MMR, पिंपरी चिंचवड, पुणे, मालेगाव वगळून इतर शहरांमधील सर्व प्रकारची दुकान सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *