देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला दोन लाखावर.

देशातील कोरोनाबाधीतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ८१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३०३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासात ४ हजार ७७६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ४८.३१ टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १ हजार ४९७ आहेत.

देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजारांवर पोहचला आहे. महाराष्ट्रात सध्या ३८ हजार ४९३ अॅक्टिव रुग्ण असून ३१ हजार ३३३ रुग्णांनी आतपर्यंत कोरोनावर मात केली आहे. काल एका दिवशी १२२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून जगभरात आतापर्यंत जवळपास ६५ लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ३ लाख ८१ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३० लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *