देवेंद्र फडणविसांचे शिवसेनेला आव्हान “ हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या.”

एका कार्यक्रमादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ हिम्मत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खूल आव्हान विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व भाजपा नेते देवेंद्र फडणविस यांना दीलं होत. त्यावर आता भाजपा नेते देवेंद्र फडणविस यांनी प्रती आव्हान दिलं आहे, हिम्मत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या. आणि जनादेशाला समोर जावून दाखवा. आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही असं फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाधिवेशनात बोलत होते.

विभिन्न विचारसरणी असलेले तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, अशी टीका भाजपा कडून येत असतांनाच उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यावर आता फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या टेलीग्राम चॅनल ला जॉईन करा
 येथे क्लिक करा →   घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *