दिव्यांगाच्या मदतीसाठी धावले नितिन गडकरी.

पुण्याच्या बालेवाडी मैदांनावर १३ ते १५ मार्च दरम्यान शाळकरी दिव्यांग विद्यार्थ्यांची राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे हे आयोजन करण्यात आले असून नागपुर जिल्ह्यातील शाळांमधील दिव्यांग या स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यामुळे त्यांना जाण्यासाठी रेल्वेगाडीत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग शाळेचे अध्यक्ष रमेश भंडारी यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन दिले. पुण्यात जाऊन आपले कर्तुत्व,सिद्ध करणाची जिद्द या मुलांमध्ये होती ती जिद्द पाहून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी देखील प्रभावित झाले आणि त्यांनी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना पत्र लिहिले व चक्क दोन डब्बे बुक करावे असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले. या व्यतिरिक्त हे दिव्यांग विद्यार्थी गरीब असल्याने त्यांना सवलत देण्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले.
आपल्या दिलदार स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले नितिन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपला मोठेपणा दाखवून दिला. दिव्यांगासाठी त्यांनी अवघ्या चार दिवसात दोन डब्बे बुक केले.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या फेसबूक ट्विटर  व टेलीग्राम  ग्रुप वर जाईन व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *