दिल्ली हिंसाचार प्रकरण, हिंसाचार करणार्‍यांना ‘ऑन द स्पॉट गोळी मारण्याचे’ दिल्ली पोलिसांचे आदेश.

गेल्या दोन महिन्यापासून शांततेत सुरू असलेल्या सीएए विरोधातील आंदोलनास अचानक किणसाक वळण लागले. सोमवारी तर हिंसेने रूद्र रूप धरण केले. आता पर्यन्त हिंसाचारात एका पोलीसासोबत १३ जणांचा बळी गेला असून ६७ पोलिसांसह शेकडो सामान्य नागरिक जखमी झाले आहे. यामुळे आता दिल्ली सरकारने गंभीर पाऊल उचलले असून जाफराबाद,मौजपुर ,चांदबाग , कारावाल नगर येथे संचार बंदी लागू करण्यात आली व दंगेखोरांना दिसता क्षणी गोळी मारण्याचे आदेश दिले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर असतांनाच हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणात उफाळून आल्याने यामागे कट असल्याची शक्यता गृह विभागाकडून वर्तवीण्यात आली आहे. सोमवारी हिंसाचारमुळे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सह नायब राज्यपाल अनिल बैजल उपस्थित होते.
गृहमंत्र्यांनी दिल्लीकरांनी शांततेचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर अमित शाह यांनी दिल्ली सरकारला सहकार्याचे आश्वासन दिले. केजरीवाल यांनीही आपल्या आमदारांची बैठक बोलवली आहे.

दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहे. दिल्ली बाहेरून येणार्यांनवर रोख लावण्याचा विचार चालू असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *