दिल्ली ची ‘शांतते’ कडे वाटचाल

गेल्या महिन्याभरापासुन दिल्लीत सीएए विरोधात शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र या आंदोलनाने अचानक रौद्र रूप धारण केले. आंदोलन चिघडले. दिल्लीत खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू झाला. या हिंसाचाराणे आत्ता पर्यन्त १८ लोकांचा बळी घेतल्याचे माहिती समोर येत आहे. दिल्लीत हिंसाचाराने २०० पेक्षा जास्त लोकं जखमी झाले आहे.

आता दिल्लीतील हिंसाचार कमी करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जनतेला शांततेचे आवाहन सुद्धा केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शांततेचे आवाहन केले. तसेच सर्वपक्षीय राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार यांनी सुद्धा शांततेचे आवाहन केले होते.

अजित डोवाल यांच्यावर दिल्ली शांत करण्याची जवाबदारी  

दिल्लीत चालू असलेला प्रचंड हिंसाचार शांत करण्याची जवाबदारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर देणायात आली होती. कल त्यांनी दिल्लीत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अजित डोवाल यांनी दिल्लीतील चौकांमध्ये जाऊन शांततेचे आवाहन केले. त्यामुळे आता दिल्ली शांत होत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील हिंसाचार करणार्याद काही संशयीतांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच बरोबर कल दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणार्‍यांना दिसता  क्षणी गोळी मारण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली शांत झाल्याचे वृत्त येत आहे.   

‘हमी पेक्षा कमी’ भावाने कापूस खरेदी बळीराजा हवालदिल.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप वर जाईन व्हा.

घडामोडी महाराष्ट्राच्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *