दिलासादायक…! ७५ वर्षानंतर पृथ्वीवर पहिल्यांदाच एवढी शुद्ध हवा.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या संपूर्ण जग ठप्प आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आल्या आहे. देशातील सर्व उद्योग बंद आहे. त्यातच भारतासारखे अनेक देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे देशातील वाहतूक जवळपास बंदच्या बरोबर आहे. लॉकडाऊनमुळे पृथ्वीला मोठा दिलासा मिळाला आहे. पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. अशी स्वच्छ हवा 75 वर्षानंतर पृथ्वीवर आढळते आहे.

यापूर्वी दुसर्‍या महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती.याआधी  2008 च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झालं होतं. त्यामुळे 1.4 टक्के घट पाहायला मिळाली होती.ग्लोबल कार्बन प्रोजेक्टचे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटलं की, यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये 5 टक्के घट झाली आहे. वैज्ञानिकांच्या मते, कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे कार्बन उत्सर्जनमध्ये 10 ते 20 टक्के घट झाली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *