दिलासादायक..! लॉकडाउनचा फायदा होतोय,कोरोनाचा वेग मंदावतोय.

सरकारकडून करण्यात आलेल्या  प्रयत्नांना आता  यश येतांना दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग आला कमी होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. लॉकडाउन आधी वेग वाढत असल्याचे चित्र समोर येत होते मात्र आता सकारात्मक व दिलासा देणारी माहिती म्हणजे कोरोनाचा वेग मंदावत आहे.

बीसीजी लसीमुळे कोरोनाचा होण्याचा धोका कमी होत असल्याचे बोलले जात आहे, परंतु त्यावर अजून काही ठोस सांगता येणार नाही पुढील आठवड्यापासून बीसीजी लसीचा अभ्यास सुरू करण्यात येईल सध्यातरी आमच्याकडे कोणतेही निष्कर्ष नाही. त्यामुळे बीसीजी लस कोरोंनासाठी द्या असे सांगता येणार नाही. असे आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी स्पष्ट केले. कोरोना पासून मुक्त होणार्यां ची संख्या देखील आता १३.६ टक्क्यावर पोहचली असल्याची सकारात्मक बाब आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी अधोरखीत केली.

भारत ठरतोय जगासाठी वरदान.५५ देशांना करणार हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *