दिलासादायक…! देशात पहिल्यांदाच कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या कोरोनाबाधितांपेक्षा वाढली.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत झपाट्याने वाढत आहे. तरी मात्र दिलासादायक बाब समोर येत आहे ती म्हणजे देशात पहिल्यांदाच अॅक्टिव कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेले रुग्ण वाढले आहे. कोरोनाचा प्रभाव देशभरात वाढत असताना पहिल्यांदा असं घटलं आहे. याचा अर्थ असा की देशभरातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या चिंताग्रस्त वातावरणात ही आकडेवारी सकारात्मक आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ७६ हजार ५८३ झाली आहे. यामध्ये १ लाख ३३ हजार ६३२ रुग्णांवर सध्या उपचार (अॅक्टिव्ह केस) सुरु आहेत. तर १ लाख ३५ हजार २०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सलग सहाव्या दिवशी देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९५०० हून अधिक वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत सध्या जगात अमेरिका पहिल्या स्थानावर असून भारत सहाव्या नंबरवर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *