दिलासादायक….! देशातील कोरोनामुक्त होणार्‍या रूग्णांच्या संख्येत वाढ.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोनापासून मुक्त होणार्‍यांची  संख्या वाढली आहे. देशातील ११००० पेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या ४२५३३ वर पोहचली असून त्यातील ११००० पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहे तर २९ हजारच्या वर अॅक्टिव रुग्ण आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात १०७४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे. कोरोना व्हायरस सारखे साथीचे आजार क्वचितच आढळून येतात. त्यामुळे लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं योग्य पालन झालं नाही तर, कोरोना व्हायरसच्या संसर्ग आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.

सध्या देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील १२९७४ लोक कोरोनाबाधित आहे. गुजरातमध्ये ५४२८, हरियाणामध्ये ४४२, राजस्थानमध्ये २८८६, तामिळनाडूमध्ये ३०२३, तेलंगणामध्ये १०८२, त्रिपुरामध्ये १६, उत्तराखंडमध्ये ६०, उत्तर प्रदेशात २६४५ हिमाचल प्रदेशात ४०, जम्मू-काश्मीरमध्ये ७०१, झारखंडमध्ये ११५ , कर्नाटकात ६१४ , केरळमध्ये ५०० , लडाखमध्ये ४१ , मध्य प्रदेशात २८४६ , मणिपूरमध्ये २ , मेघालयामध्ये १२ , मिझोरममधील १ , ओडिशामध्ये १६२ , पाँडेचरीमध्ये ८ , पंजाबमध्ये ११०२ , आंध्र प्रदेशात १५८३ , अंदमान-निकोबारमध्ये ३३ , अरुणाचल प्रदेशात १ , आसाममध्ये ४३ , बिहारमध्ये ५०३ , चंदिगडमध्ये ९४ , छत्तीसगडमध्ये ५७ , दिल्लीत ४५४९, पश्चिम बंगालमध्ये ९६३  कोरोनाचे रुग्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *