दिलासादायक….! आता दुरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी.

संपूर्ण जगाला ज्या कोरोनाने वेढले आहे आता त्याबाबत एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. एखादी व्यक्ति कोरोना संशयित आहे की नाही हे आता दुरूनच ओळखणारे उपकरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोरोना संशयित व्यक्ति ओळखण्यासाठी दुसर्‍या
व्यक्तीची गरज पडणार नाही. रोपर आयआयटीच्या (IIT Ropar) इंजिनीअर्सनी इन्फ्रारेड व्हिजन सिस्टम (infrared vision system) तयार केलं आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्ती स्वत:चा चेहरा स्कॅन करेल आणि दुसऱ्या ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटरवर ती व्यक्ती कोरोना संशयित आहे की निरोगी हे समजण्यास मदत होईल.

आयआयटी रोपर मधील इलेक्ट्रिकल इंजीनियर विभागाचे प्रोफेसर यांच्या महितीनुसार एखाद्या व्यक्तिला सर्दी ताप किंवा कोरोनाचे लक्षण आहे का ? तसेच ती व्यक्ति कोरोना संशयित आहे की निरोगी आहे. याबाबत निदान करण्यासाठी हे उपकरण मदत करेल. गर्दीच्या ठिकाणी याचा चांगला वापर होऊन हे उपकरण कमी येऊ शकते असा विश्वास शास्त्रज्ञांकडून व्यक्त केल्या जात आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *