दाढी-कटींगला येतांना नॅपकिन सोबत आणण्याचे नाभीक महामंडळाचे आवाहन

कोरोना मुळे सध्या सर्वच व्यवसायावर बिकट परिस्थिति आली आहे. काही व्यवसाय अगदी ठप्प झाले आहे. त्यातच कोरोना बाबत विविध मेसेज पसरत आहे. काही चांगले तर काही अफवा असलेले मेसेज पसरत आहे. त्याच्यातच सध्या एक दाढी आणि कटींग संदर्भात एक मेसेज वायरल होत आहे. त्या मेसेजमध्ये काही दिवस घरीच दाढी कटींग करण्याचे लिहिले असून त्यावर आता नाभीक समाजाने आक्षेप घेतला आहे. चुकीचा मेसेज पसरत असून याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होत आहे त्यामुळे यापुढे  असे मेसेज पाठविल्यास मेसेज पसरविणार्‍यावर  सायबर act नुसार गुन्हा नोंदविण्यात येईल असे आवाहन नाभीक समाजाकडून करण्यात आले आहे.

दाढी कटींग करायला येतांना आपली नॅपकिन आपण आणावी असे आवाहन नाभीक समाजातर्फे करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांनी दुकानात येतांना मास्क लावून यावे. कोणतेही कारण नसतांना दुकानात जास्त वेळ बसू नये. चेहरा साफ करण्यासाठी स्वत:चा रुमाल वापरावा असे आवाहन नाभीक समाजातर्फे करण्यात आले आहे.

कोरोनाचा फटका, चंद्रपूरतील शासकीय रक्तपेढीत रक्ताची कमतरता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *